संपूर्ण जगभरात Omicron BA.2 Sub Variant थैमान घालण्याची शक्यता; WHO ने दिला इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली, मंडे टू मंडे वृत्तसेवा। जगभरात कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट पसरले आहेत. यापैकी डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. डेल्टा व्हेरिएंट हा जीवघेणा ठरला असून ओमिक्रॉन हा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. आता ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट बीए २ (Omicron BA.2 Sub Variant) हळूहळू पसरत आहे. आता संपूर्ण जगभरात ओमिक्रॉनचा हा सब व्हेरिएंट पसरण्याची शक्यता आहे. पण अजून मूळ ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये पुन्हा संसर्गाचे कारण सब व्हेरिएंट ठरले की नाही हे स्पष्ट झाले नाही. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. सीएनबीसीने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मारिया वान केरखोव यांच्या माहितीनुसार, बीए.२ सब व्हेरिएंट सध्याच्या प्रमुख बीए.१ व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्मवरील लाईव्ह स्ट्रीम केलेल्या एका प्रश्न उत्तराच्या सत्रात वान केरखोव म्हणाल्या की, बीए.२, बीए.१ तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आम्हाला बीए.२ सब व्हेरिएंट जगभरात वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटना बीए.२वर लक्ष ठेवत आहे. कारण हा सब व्हेरिएंट काही देशांमध्ये नवे कोरोनाबाधित वाढण्याचे कारण बनते. यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होते आणि नंतर ओमिक्रॉन रुग्णसंख्येत वेगाने घसरण होते, असे पाहायला मिळाले आहे. सध्या सब व्हेरिएंटवर अजूनही तपास सुरू आहे. डेन्मार्कमधील संशोधनकर्त्यांनुसार, बीए.२ बीए.१च्या तुलनेत जवळपास १.५ पटीने संसर्गजन्य आहे