भारतावर विजेचे संकट , तज्ज्ञांनी दिला इशारा,जाणून घ्या कारण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये वीज संकट निर्माण झालं आहे. आता भारतातही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि अन्य एजेंसीच्या आकडेवारीनुसार तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. देशातील एकूण १३५ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांपैकी फक्त ७२ केंद्रांमध्ये ३ दिवस पूरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, १३५ औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये एकूण ६६.३५ टक्के विज निर्मिती केली जाते. जर ७२ विजनिर्मिती केंद्र कोळशाच्या अभावी बंद झाले तर साधारण ३३ टक्के विजेची निर्मिती कमी होईल. यामुळे देशात विजेचं संकट उत्पन्न होऊ शकतं.
ऑगस्ट २०१९ मध्ये भारतात दररोज १०६६० कोटी युनिट वीज वापरली जात होती. ती ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये वाढून १४४२० कोटी युनिट झाली आहे. दोन वर्षात कोळशाचा वापर १८ टक्क्यांनी वाढला आहे. देशातील कोळशाच्या संकटामुळे विजनिर्मितीत अडचणी येऊ शकतात यासंबधिचे आकलन तज्ज्ञांनी ऑगस्टमध्येही केले होते.