भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

WHO च्या उत्तराने चिंता वाढवली,कोरोना संकट
तो पर्यंत कायमच

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवीदिल्ली(वृत्तसंस्था)। गेल्या दीड वर्षांपासून जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना माहामारी कधी संपणार हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. कोरोना मुळे होणारे मृत्यू लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता जगाला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं आहे. त्यातच आता जागितक आरोग्य संघटनेनं एक नवीन माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यावरुन जग लवकर या संकटातून मुक्त होणार नसल्याचे दिसते आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना माहामारी अजून संपली नसून, कोरोना विषाणु संसर्गाला पुढचे काही दिवस माहामारीच्या श्रेणीमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी येणाऱ्या काळात अनेक दिवस कोरोना प्रतिबंधक नियमांची काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातचं कोरोनाचे नवीन व्हेरियंट चिंता वाढवणारे ठरता आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं यावेळी कोरोनाच्या या लढाईत लसीकरण अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. लसीकरणामुळेच कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊन मृत्यूची संख्या कमी होईल असे यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

दरम्यान, आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे आढळल्याने खळबळ माजली आहे.चीनच्या उत्तर पुर्व भागातील असणाऱ्या फुजियान प्रांतामध्ये असणाऱ्या झियामेन (Xiamen) शहरात कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळ्यानंतर शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या या शहरात पर्यटनासाठी असलेल्या हॉटेल, बार, सिनेमागृह, जीम आणि वाचनालयं बंद करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले असून, यामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!