महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दिल्लीत राजपथावर होणार अनोखे दर्शन ,चित्ररथाची बांधणी अंतिम टप्प्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमत महाराष्ट्रातील कास पठारचा चित्ररथ असणार आहे. राजपथावर यावेळी दिसणार्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर आली असून, सध्या या चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राज्य सरकारने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राखीव ठेवले आहेत. अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
यंदाच्या चित्ररथावर Rajpath दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर 15 फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीत समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शवण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ तीन फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा दर्शविण्यात आली आहे.
चित्ररथाच्या Rajpath अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा सुमारे 14 ते 15 फूट उंचीपर्यंत आहे. तसेच दुर्मिळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या 4 ते 5 फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून, त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.
चित्ररथ नाकारल्याच्या अफवा प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ Rajpath केंद्राने नाकारल्याच्या खोट्या बातम्या माध्यमांना देण्यात आल्या हा खोडसाळ असून, चित्ररथाचे काम व्यवस्थित सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्राच्याही चित्ररथाला परवानगी न दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्टीकरण दिले. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीत महाराष्ट्रातील कास पठारचा चित्ररथ असणार आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्राच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीत चित्ररथाची बांधणी सुरू असून, कामकाज अंतिम टप्प्यात आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा