भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

आज पासून ” या ” राज्यात वीकेंड कर्फ्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवीदिल्ली,वृत्तसंस्था। देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा वेग वाढला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दिल्लीमध्ये येत्या २४ ते ४८ तासांत २० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. याच दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिल्लीत आज, शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू होणार आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनुसार, दिल्लीत शनिवारी आणि रविवारी कर्फ्यू लागू राहिली. त्यामुळे आज आपण दिल्लीतील या वीकेंड कर्फ्यू दरम्यान काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार हे पाहूयात….

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही
वीकेंड कर्फ्यू दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्याची परवानगी दिली नाही. जर या नियमाचे उल्लंघन झाले तर २ हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच ही चूक पुन्हा केल्यावर महामारी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होईल आणि जेलमध्ये जावे लागेल.

वर्क फ्रॉम होमची परवानगी असणार
दिल्लीत पुढील आदेशापर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत वीकेंड कर्फ्यू लागू राहिल. रात्री १० वाजल्यापासून ते ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. यादरम्यान लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भाजी, औषधे आणि खाण्या-पिण्याची दुकाने खुली राहणार
वीकेंड कर्फ्यूदरम्यान अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही. याबाबत आदेश जारी केले आहेत. त्याअंतर्गत वीकेंड कर्फ्यूदरम्यान अन्न, भाजीपाला आदी अत्यावश्यक सुविधांची विक्री बंद केली जाणार नाही. १०० टक्के आसान क्षमतेने धावणार मेट्रो
शनिवार आणि रविवारच्या दिल्लीतील वीकेंड कर्फ्यूदरम्यान बस आणि मेट्रोमध्ये १०० टक्के आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी आहे. यादरम्यान कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. यात रुग्णालय, आरोग्य केंद्र, पोलीस, अग्निशमन दल आणि आपात्कालीन सेवा देखील सामील असतील. माध्यम कर्मचाऱ्यांना मिळाली सूट
दिल्लीतील वीकेंड कर्फ्यू दरम्यान माध्यम कर्मचाऱ्यांना (प्रिंट, वेब आणि टेलिव्हिजन न्यूज चॅनल) प्रवास करण्यास परवानगी दिली जाईल. यावेळी ओळखपत्र दाखवावे लागेल. खासगी कर्मचारी ओळखपत्र दाखवून दिल्लीबाहेर जाऊ शकतात
जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि नोएडा, गुरुग्राम सारख्या शहरात काम करत असाल तर ओळखपत्र दाखवून तुम्ही प्रवास करू शकता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!