सर्वात मोठी बातमी; हिमस्खलनात गस्ती पथकातील सात जवान दबले गेले,बचावकार्य सुरू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,मंडे टू मंडे वृत्तसेवा। अरुणाचल प्रदेशमधून मोठी बातमी हाती येत आहे. येथील कामेंग सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्ती पथकातील सात जवान दबले गेले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेश येथील कामेंग सेक्टरमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. जवानांची गस्त सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. कामेंग भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यातच हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील किमान सात जवान अडकल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. रविवारी ही घटना घडली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी विशेष विमानाने अधिक कुमक पाठवण्यात आली आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले