रावेर

रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशन वाटपात अडथळे; भ्रष्टाचाराचा आरोप

ऐनपुर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. विजय के अवसरमल | रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शिधा पत्रिकेवर शासनाने निर्धारित केलेल्या मापाप्रमाणे पुरेसे धान्य मिळत नसल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, ऐनपूर यांनी तहसीलदार, रावेर यांच्याकडे याबाबत लेखी अर्ज दाखल केला आहे.

संस्थेच्या अर्जानुसार, तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून दिव्यांग बांधवांना पुरेसे धान्य दिले जात नाही. तक्रार केल्यास दुकानदारांकडून उडवाउडवीची उत्तरे आणि अरेरावीची वागणूक मिळते. गावातीलच असलेले रेशन दुकानदार यामुळे बिनधास्तपणे भ्रष्टाचार करत असून, दिव्यांगांचे हक्काचे रेशन त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक दिव्यांग बांधव त्यांच्या हक्कापासून वंचित राहत आहेत.

संस्थेने तहसीलदारांना विनंती केली आहे की, प्रत्येक रेशन दुकानावर शासनाकडून प्राप्त धान्याचा तपशील लावणे बंधनकारक करावे आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासनाने ठरवलेल्या मापाप्रमाणे रेशन मिळेल याची खात्री करावी. तसेच, अंत्योदय योजनेतील सर्व लाभ दिव्यांगांना मिळावेत, अशी मागणीही केली आहे.निवेदन देते वेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे, सचिव जितू कोळी, शेख कमील शेख राऊफ, सुनील काकडे, शेख खालील, शेख अदिल शेख फरीद, शेख असलम, शेख फरीद शेख हमीद आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार संजय तायडे यांनी हे निवेदन स्वीकारले.

निवेदन देते वेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे, सचिव जितू कोळी, शेख कमील शेख राऊफ, सुनील काकडे, शेख खालील, शेख अदिल शेख फरीद, शेख असलम, शेख फरीद शेख हमीद आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार संजय तायडे यांनी हे निवेदन स्वीकारले.

या प्रकरणी तहसीलदार कार्यालयाकडून तातडीने कारवाई करून रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्याची गरज आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!