भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्रसामाजिक

लायसन्स काढणे आता अधिक सोपे, ड्रायव्हिंग लायसन्स साठी नवीन नियम, काय आहेत नियम

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क lआता लायसन्स काढणे अधिक सोपे होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये हेलपाटे घालण्याची गरज नाही. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या नियमांची घोषणा केली आहे. तुम्ही लायसन्स साठी सरकारमान्य खासगी संस्थेतही ही परीक्षा देऊ शकता. त्यामुळे वाहनचालकांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

जवळपास ९ लाख जुन्या सरकारी वाहनांना बाद करणे तसंट कार उत्सर्जन नियमांना लागू करत प्रदूषणची पातळी कमी करणे हा नव्या नियमांचा उद्देश आहे. त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्तींनी वेगानं वाहन चालवल्यास त्यांना अधिक दंड बसणार आहे. नव्या नियमांनुसार वेगानं वाहन चालवण्यासाठी १ हजार ते २ हजार रुपये दंड आहे. पण, अल्पवयीन व्यक्ती वेगाने वाहन चालवताना पकडली गेल्यास त्याला २५,००० रुपये दंड भरावा लागेल. त्याचबरोबर त्या वाहन मालकाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. तसंच त्या अल्पवयीन व्यक्तीला २५ वर्षांपर्यंत लायसन्स न मिळण्याची तरतूद नव्या नियमांमध्ये आहे.

हे नियम १ जून पासून लागू करण्यात येणार असून, या १ जूनपासून लागू होणाऱ्या आरटीओच्या नियमानुसार सरकारमान्य संस्थेमध्येही तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला टेस्ट देण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागणार नाही. ड्रायव्हिंग सेंटरसाठी देखील विशेष नियम आहेत. त्यानुसार त्यांच्याकडं किमान १ एकर जमीन हवी. ती संस्था चारचाकी वाहनांचं प्रशिक्षण देत असेल तर त्यांच्याकडं दोन एकर जमीन आवश्यक आहे. ड्रायव्हिंग स्कुलमध्ये टेस्ट घेण्यासाठी विशेष सुविधा असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांकडं किमान हायस्कूल डिप्लोमा तसंच पाच वर्ष ड्रायव्हिंगचा अनुभव असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या नियमांचीही माहिती आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. पण, ५० सीसी क्षमतेच्या वाहनांसाठी १६ व्या वर्षी देखील लायसन्स मिळू शकतं. पण, वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे लायसन्स अपडेट करणे आवश्यक आहे.असे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालया कडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!