भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

फैजपूर प्रांत अधिकाऱ्यांचा कार्यालयाला खो…..विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले प्रलंबित… विद्यार्थी – पालकांची पायपीट

गहुखेडा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l फैजपूर येथील प्रांताधिकारी रजेवर असल्याने त्यांचे जागी प्रभारी नियुक्त केलेले. ‘उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी फैजपूर भाग फैजपूर.’ अर्थात प्रांत कार्यालयात वेळेवर येत नाही.त्या मुळे रावेर – यावल रावेर व यावल परिसरातील किमान अंदाजे  १०० विद्यार्थी दररोज प्रांत कार्यालयावर दाखल्यांकरिता फेऱ्या मारत आहेत व दहा दिवसांपासून प्रांताधिकारी महोदय रजेवर असल्यामुळे शैक्षणिक कामासाठी मागितले जाणारे सर्व प्रकारचे दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रांत अधिकाऱ्यांबद्दल तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली जात आहे.

फैजपूर प्रांत अधिकारी रजेवर असल्यामुळे त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले आहे ते सुद्धा प्रांत कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले वेळेवर मिळतील हे सांगता येत नाही म्हणून हे असे दृश्य पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल यात तीळ मात्र शंका नाही. रावेर – यावल तालुका परिसरातील ठिकठिकाणचे विद्यार्थी व त्यांचे पालक प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये
चकरा मारत असल्याचे दिसून येत असल्याचे चित्र फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात दिसून येत आहे. हे सर्व प्रकारचे शैक्षणिक दाखले लवकरात लवकर मिळावे यासाठी

या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे रावेर तालुकाध्यक्ष राजेंद्र कैलास चौधरी यांनी या प्रकरणी विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेता कार्यभार असलेल्या अधिकार्‍यांनी नियमीतपणे येऊन दाखल्याचे वाटप करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!