१ कोटींच्या वर रोकड, साडेपाच किलो सोनेचांदी, प्रॉपर्टीचे कागद सापडले, १ कोटींची लाच प्रकरणातील फरार पोलिस नि. खाडे याचे घरात
फौजदार जाधवर च्या घरात सापडले २५ तोळे सोने
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बिल्डरला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटी रूपयांची लाच बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी मागितली होती. त्या सह सहाय्यक फौजदार रविभुषण जाधवर व खाजगी इसम यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पोलिस निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत.
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खाडे यांच्या बीड मधील भाड्याच्या घरात रोख एक कोटी ८ लाख रुपये, १० तोळे सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे सापडले आहेत. बारामतीसह परळीतील फ्लॅट, इंदापूर येथे फ्लॅट आणि व्यापारी गाळा अशी स्थावर मालमत्ता देखील आढळून आली, तसेच सोन्याची बिस्किट आणि 72 लाख रुपयांचे दागिने तसेच सहाय्यक फौजदार राविभूषण जाधवरच्या यांच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. तसेच रोख १८ हजार एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व जप्त केली आहे. पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली.
पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला हरिभाऊ खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.