भारतीय जनता पार्टी तर्फे गाव/ वस्ती संपर्क अभियान
मुंजलवाडी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. चंद्रकांत वैदकर | भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जयंत प्रकाश नड्डाजी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात रविंद्र चव्हाण ( प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ) यांचा मार्गदर्शना नुसार दिनांक 26 एप्रिल व 27 एप्रिल या दिवशी गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत मुंजलवाडी गावातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यात सकाळी अकरा वाजेला “मन की बात” या कार्यक्रम पाहण्यासाठी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. गावातील / वस्तीतील , मंदीर , शाळा परिसर . स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अंगणवाडी, ग्रामपंचायत भेट दिली.
भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावात पक्षांचे झेंडे घेऊन गावात पदयात्रा काढली.
तसेच गावातील रहिवाश्यांसोबत सोबत चौक सभा घेऊन लोकांच्या घरी जावुन गावातील नागरिक , जेष्ठ नागरीक , महिलांना यांना शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पी एम किसान सन्मान निधी,प्रधानमंत्री घरकुल योजना, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांशी संवाद साधुन या योजनांचा लाभ मिळत आहे की नाही याबाबत चर्चा केली.
तसेच भाजपा जेष्ठ कार्यकर्ता यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित अरुण शिंदे ( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उद्योग आघाडी ),उमेश महाजन (भाजपा तालुका चिटणीस ), प्रदीप शिंदे तसेच गावातील भाजपा कार्यकर्ते प्रविण धनगर ( मुंजलवाडी भाजपा शाखा प्रमुख ), ज्ञानेश्वर अजलसोंडे, चंद्रकांत वैदकर, जिवन धनगर, विजय धनगर विठ्ठल चौधरी, डोंगर वाघ, समाधान पाटील, जहागीर तडवी, नामदेव अजलसोंडे, हर्षल धनगर, हबीब (गोलु ) तडवी तसेच सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन उत्साहाने कार्यक्रम राबविण्यात आला.