दिवाळी निमित्त आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : दिवाळी सण हा सर्वांचा गोड व आनंददायी जावा याकरिता राज्य शासनाने आनंदाचा शिधा म्हणून धान्य दुकानांवर केवळ शंभर रुपयात चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच निमित्ताने आज आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार यांच्या हस्ते धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जनसामान्य नागरिकांची दिवाळी ही गोड व आनंददायी व्हावी याकरिता आनंदाचा शिधा म्हणजे केवळ शंभर रुपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तू रेशनिंग दुकानावरून ज्या लाभार्थ्यांना दोन रुपये व तीन रुपये प्रतिि किलोने धान्य मिळते त्यांचे करिता उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच राज्य शासनानेेेे मंजूर करून दिले.
आमदार चंद्रकांंत पाटील यांनी घेतलेल्या आढाव्यात मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यातील दहा तर शहरातील सहा धान्य दुकानांवर तर बोदवड येथील 13 तसेच रावेर भागातील 22 सदरील किट उपलब्ध आहे तर येत्या एक ते दोन दिवसात मतदारसंघातील प्रत्येक रेशन धान्य दुकानांवर हे किट उपलब्ध होणार आहे. यावेळी शिवसेनााा तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक निलेश शिरसाट, संतोष मराठे, राजेंद्र् हिवराळे, संतोष कोळी, दिलीप पाटील वसंता बलबले असंख्य शिवसैनिक व शिधा लाभार्थी होते.