भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगावसामाजिक

जागतिक महिला दिना निमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व रेड स्वस्तिक सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १५० महिलांनी नावनोंदणी करून सहभाग घेतला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदार पंडित (एम.बी.बी.एस., एम.डी. मेडिसिन), डॉ. प्रियंका पंडित (BDS, MUHS – कन्सल्टिंग डेंटल सर्जन व मुखरोग तज्ञ), इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. अमृता सोनवणे (नगरसेविका, मनपा), रेड स्वस्तिक सोसायटीचे सचिव डॉ. गणेश पाटील, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद आमोदकर तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील उपस्थित होत्या.


शिबिरामध्ये थायरॉईड ग्रंथीचे आजार, बदलती जीवनशैली, डायबिटीज तसेच दंत व मुख आरोग्य या विषयांवर मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. डॉ. मंदार पंडित यांनी थायरॉईड ग्रंथीचे आजार, त्यांची लक्षणे तसेच योग्य आहार व व्यायाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रियंका पंडित यांनी दंत व मुखरोगांबाबत माहिती देत त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. अमृता सोनवणे यांनी महिलांमध्ये वाढत चाललेल्या हाडांच्या झिजेबाबत व हाडांची काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.


शिबिरात सहभागी झालेल्या महिलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. तसेच CBC, BSL व थायरॉईड यांसारख्या तपासण्या शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा मौर्य व रेणुका हिंगु यांना मान्यवरांच्या हस्ते “उत्कृष्ट कार्यकर्ता” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनीषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी तर आभार प्रदर्शन नूतन तासखेडकर यांनी केले. या शिबिराच्या आयोजनासाठी नेहा जगताप, संतोष जगताप व नाजिम शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, नीता वानखेडकर, विद्या जकातदार, शोभना मकवाना, कांचन पाटील, रेणुका हिंगु, लीना पाटील, हर्षा गुजराती, स्मिता पाटील, पूर्वी शहा, अर्चना पाटील आदी उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!