टेलरिंग दिवस निमित्ताने समता फाऊंडेशन मुबंई तर्फे आदिवासी भागात कपडे वाटप
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दिनांक 28 फेब्रुवारी रोजी टेलरिंग दिवस निमित्ताने रावेर तालुक्यातील नवी मोहमांडली , अंधारमळी , तिड्या या आदिवासी गावांमधे समता फाऊंडेशन मुबंई, यांच्या तर्फे गावातील जिल्हा परिषद शाळा मोहमांडली नवी ,अंधारमळी, तिड्या, तसेच प्राथमिक / माध्यमिक आश्रम शाळा मोहमांडली नवी, या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे हे कपडे समता फाउंडेशन तर्फे विविध शाळांमध्ये माध्यमिक विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून विद्यार्थिनींनी च तयार केलेले कपडे होते तेच कपडे समता फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना वाटप केले गेले. याप्रसंगी समता फाऊंडेशन चे प्रतिनिधी आशाताई तडवी, संगीता पाटील, रुबिना तडवी, सकीना तडवी, खुशाली जंगले , रुपाली धनगर, तसेच मोहमांडली गृप ग्रामपंचायत चे सदस्य जुम्मा तडवी, तिघे शाळांचे मुख्याध्यापक विनोद बाविस्कर सर, चेतन खोंडे सर, विजय पाटील सर तसेच सर्व शिक्षक आणि आश्रमशाळा येथील शिक्षक बाविस्कर सर, मुस्तफा तडवी सर व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.