भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

फिरत्या नारळी सप्ताह निमित्त कुंभारखेडा नगरीला आले प्रति पंढरपूरचे स्वरूप

कुंभारखेडा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रा योगेश कोष्टी | आदिशक्ती मुक्ताई च्या पादुकांनी पवित्र झालेल्या श्री शेत्र कुंभारखेडा नगरीस आज पासूनबीप्रति पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज पासून कुंभारखेडा येथे सकल रावेर आणि यावल हिंदू समाज आणि प पू जनार्दनजी महाराज आणि मुक्ताबाई संस्थानाचे ह भ प हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाने युवकांसाठी ग्रंथराज ध्यानेश्वरी चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


कथा प्रवक्ते म्हणून ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर आणि ह भ प जयवंत महाराज बोधले हे मार्गदर्शन करणार असून सदर कार्यक्रमास प पू रामगिरीजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. सदर सप्ताहात सकाळी १० ते १२ आणि रात्री ८ ते १० रात्री हरी कीर्तन चे आयोजन केले आहे.
रोज ध्यानेश्वरी चिंतन दुपारी ३ ते ५ या वेळात होणार असून युवकांसाठी मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.


सदर सप्ताहात हभप कान्होबा महाराज देहूकर, हभप अनिल महाराज बार्शी, हभप महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, हभप विशाल महाराज खोले, हभप यशोधन महाराज साखरे आळंदी, हभप ॲड. जयंत महाराज बोधले, हभप भरत महाराज चौधरी म्हैसवाडी, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम, हभप दुर्गादास महाराज नेहेते, हभप संदिपान महाराज शिंदे हासेगावकर, हभप महंत रामगिरीजी महाराज, हभप गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. दि २४ रोजी रवींद्र महाराज हरणे यांचे सकाळी नऊ ते 11 या वेळेस काल्याचे किर्तन होणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजेपासून महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाभरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!