महिला दिनानिमित्त युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत अंबरनाथ शाखेच्या वतीने अंबरनाथ येथे विविध उत्साहात कार्यक्रम संपन्न
अंबरनाथ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, अंबरनाथ शहर शाखा यांच्या वतीने ८ मार्च – जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अंबरनाथ (पूर्व) येथील विरंगुळा सभागृह, कानसाई सेक्शन, सूर्योदय सोसायटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, लकी ड्रॉ, आकर्षक बक्षिसे तसेच विशेष आकर्षण म्हणून केळीपासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जवळपास १०५ महिलांचा या कार्यक्रम मध्ये सहभाग होता पाककलेसाठी ११ महिला सहभागी होत्या त्या मधून विजेत्यांना बक्षीस देण्यात आले याचे लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच आणि साड्या आणि अजून जवळपास 32 आकर्षक बक्षिसे महिलाना देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहराचे लाडके आमदार श्री. बालाजी किणीकर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. भाग्यश्री ताई पाचपांडे (सचिव, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, मुंबई विभाग) होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. प्रतिभा वराडे, सौ. दीप्ती म्हस्के देसाई, सौ. निलिमा रडे, सौ. संध्या म्हात्रे , सौ. अपर्णा भोईर सौ.वसंती सरदेसाई यांची उपस्थिती लाभली.
महिला दिनानिमित्त महिलांचे आरोग्य साठी डॉ स्वप्ना चौधरी यांनी आरोग्यविषयक सल्ला दिला आणि कुमारी वैदेही भंगाळे(रायझिंग स्टार)हिने आपल्या मधुर आवाजात छान गाणे म्हणूनआणि कुमारी प्रचिती वराडे हिने छान स्वागत नृत्य करून सर्व महिलांचे मन जिंकले.
यावेळी युवा समिती प्रमुख श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल महिला कार्यकारिणीचे कौतुक केले. त्याचप्रमाणे सौ. प्रतिभा वराडे यांनीही कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी श्री. प्रशांत पाटील (अध्यक्ष, अंबरनाथ शहर), सौ. स्मिता चौधरी (सचिव), श्री. नीलेश झांबरे (उपाध्यक्ष), श्री. किरण नेमाडे, श्री. चेतन चौधरी, श्री. लोकेश चौधरी, श्री. भूषण चौधरी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. स्मिता चौधरी, सौ. वैशाली पाटील, सौ. हर्षाली कोल्हे, सौ. भावना पाटील, सौ. रुपाली कोल्हे, सौ. वीणा काळे, सौ. वर्षा वराडे, प्रिया बोरले यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीरीत्वया पार पाडला.
महिलांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.


