भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप? मोदी,शिंदे व ठाकरे एकत्र येणार?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभे प्रमाणे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.परंतु असे असले तरी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होत आहेत.पण या चर्चांमध्ये तथ्य आहे का?

लोकसभेत अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. फरक एवढाच की, शिंदे यांनी महायुतीकडून निवडणूक लढविली तर ठाकरे यांनी महविकासआघडी कडून. लोकसभेत ठाकरे – शिंदे जरी एकमेकांविरुद्ध लढले असेल तरी विधानसभेत मात्र दुरावा दूर होऊन हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच शिवसेनेचे आमदार भरत गोगावले व संजय शिरसाड यांनी केलेले वक्तव्ये दोन्ही नेते भविष्यात एकत्र येण्याची संकेत देत आहेत.हे राजकारण आहे ज्याला काहीही साध्य करायचं असेल तर राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू असू शकत नाही.कोणत्याही गोष्टीची तडजोड होऊ शकते. अशी कित्येक पक्ष आहेत की ते कधी एकमेकांचे चेहरे सुद्ध बघत नव्हते,आता मात्र ते एकमेकांच्या मांडीशी मांडी लाऊन बसतात.

निवडणूक काळात भाजपकडून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेने बाबत एकत्र येण्यावर वक्तव्ये करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्ये केली.ठाकरे आमचे मित्र होते त्यांना शरद पवारांनी आमच्या पासून तोडले.आणि उद्धव ठाकरे हे भविष्यात अडचणीत आले तर त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेल असे मोदी म्हणाले होते.

या शिवाय शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं. एक हजार टक्के उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी एकत्र येणार. आपला अंदाज चुकणार नाही. फक्त वेळ बघाव लागेल. हे व्हावं लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्या मागे आहे. म्हणून मोदींकडे उद्धव ठाकरे यांना जावच लागेल.अशी शहाजी बापू पाटील म्हणाले होते. दरम्यान, २०२२ मध्ये दुरावलेले हे दोन्ही नेते २०२४ च्या विधानसभे पूर्वी येकात्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु खरचं हिंदुत्वाच्या विचारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येतील काय? हे पाहणं महत्वाचं ठरेल ठरेलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!