महिला तलठ्याचा विनयभंग, एकास अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वाळू चोरी प्रकरणातील दाखल गुन्ह्याबाबत भुसावळ शहरातील सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठीच्या अंगावरून हात फिरवत लज्जा वाटेल असे कृत्य करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार २० डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता भुसावळ सत्र न्यायालयात घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून या संदर्भात भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी २०२१ मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महिला तलाठी यांनी पकडला होता. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात महिला तलाठी या २० डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२.३० वाजता भुसावळ सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आल्या होत्या. त्या वेळी सुनील विश्वनाथ भोई, रा.साकेगाव, ता.भुसावळ. याने महिला तलाठी यांच्या पाठीवरून हात फिरवत विनयभंग केला.
महिला तलाठी यांनी या प्रकरणी शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ शहर पोलिस स्टेशनला सुनील विश्वनाथ भोई, रा.साकेगाव, ता.भुसावळ. यांचे विरोधात तक्रार दाखल केली असून सुनील भोई यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो नि उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शना खाली संदीप पालवे पुढील तपास करीत आहे.