भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात एकटी असल्याचा फायदा घेत एका तरूणाने हात पकडून तोंड दाबण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुक्यातील एका गावात घडली.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्याला आहे. २३ फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी एकटी असल्याचा फायदा घेत आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा जि.जळगाव याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तोंड दाबून तिचा विनयभंग केला.

सदर चा प्रकार पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आरोपी आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा जि.जळगाव याच्या विरोधात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपी आनंदा उर्फ भैया वाणी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे ह्या पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!