भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

भुसावळ येथील तापी नदी पुलावरून उडी घेत एकाची आत्महत्या

फैजपूर, ता. यावल. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ येथील तापी नदी पुलावरून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. यासंदर्भात फैजपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज १२ मार्च बुधवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावरून एका अनोळखी व्यक्तीने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून पोलिस ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत आहेत. फैजपूर पोलिस स्टेशनचे एपीआय रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घरक्तनस्थळी दाखल होत पुढील कारवाई करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!