रावेर तालुक्यात रेल्वेसमोर उडी घेऊन एकाची आत्महत्या
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका अनोळखी व्यक्तीने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रावेर तालुक्यातील वाघोड येथे घडली.
रावेर तालुक्यातील वाघोड येथे सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास खंबा नंबर ४८४/ २२ दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत रावेर रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी करत आहेत.
