भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

पाल वृंदावन धाम आश्रमात १३ मार्च रोजी एक दिवसीय होळी मिलन महोत्सव, मंत्री ना. संजय राठोड राहणार उपस्थित

पाल. ता रावेर. मंडे टु मंडे न्युज .विनोद जाधव l परम पूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या चरण कमलाने पावन झालेल्या पाल नगरितील श्री वृंदावन धाम आश्रमात सालाबादाप्रमाणे यंदा ही विद्यमान गादीपती श्रद्येय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात अखिल भारतीय चैतन्य साधकांच्या सहयोगाने दि १३ मार्च रोजी एक दिवसीय होळी मिलन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय भाऊ राठोड यांची उपस्थिती राहणार आहे.

परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांनी सुरु केलेल्या या होळी महोत्सवाला देशभरातून हजारो चैतन्य साधक परिवाराची उपस्थिती जाणविते. तसेच या महोत्सवात सकाळी चैतन्य साधक परिवाराची द्वज वंदना व श्री हरिधाम मंदिरात स्थित पूज्य बापूजी यांच्या समाधी चे दर्शन घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते. पाल आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज व उपस्थित संत महंत यांचे श्रद्धावचन व त्यानंतर या रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार असून महाप्रसादाची सेवा बोदरली (म. प्र) समिती तर्फे करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!