रावेर तालुक्यातील प्रौढाची २२ लाखात फसवणूक,दिल्लीच्या ठगाला अटक
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l विमा पॉलिसीचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील एका प्रौढ व्यक्तीची २२ लाखांत फसवणूक केल्याने सायबर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने एका तरुणाला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.
रावेर येथील संजय कुलकर्णी.वय ५९ वर्ष. यांना अज्ञात व्यक्तीने विमा पॉलिसीचे आमिष दाखवून त्यांची २२ लाखांत फसवणूक केली होती. या प्रकरणी फेब्रुवारी २०२४ मध्ये सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनने राहुल पाल सुखबीर सिंग. वय ३७, रा. अशोक नगर, दिल्ली. याला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.
राहुल पाल याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायमूर्ती डी.ए. सरनायक यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, प्रदीप चौधरी, उज्वला माळी यांनी केली.