जिल्हा कारागृहात एकाची हत्या, कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपींमध्ये अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पुर्व वैमनस्यातून हे हत्याकांड . मिळालेल्या माहितीनुसार, रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष व भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात. वय ५५ वर्ष. यांच्यावर दि. ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळ येथे हल्ला करून हत्या करण्यात आली होती.या हल्ल्यात रविंद्र खरात सह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता. हे हत्याकांड पुर्व वैमनस्यातून झाले होते. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती ते सर्व जळगाव जिल्हा कारागृहात आहेत.
यातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी मोठे भांडण झाले. दुपार पासूनच या दोघांमध्ये रात्री पर्यंत धुसफुस सुरू होती. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने मोहसीन असगर खान. वय ३४ वर्ष. याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. जेल प्रशासनाच्या सदरची घटना लक्षात येताच त्यांनी मोहसीन असगरला तातडीने रूग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
जिल्हा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
अनेक गैरकृत्यांनी जळगाव कारागृह हे कायम चर्चेत राहिले आहे. असे असतांना आता थेट कारागृहातच कैद्याचा खून झाल्याने कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बाबत प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरु आहे.