सावदा – रावेर रस्त्यावर बऱ्हाणपूर कडे जाणारा कांद्याने भरलेला ट्रॅक उलटला, १६ जण जखमी
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील किनगाव येथून बऱ्हाणपूर कडे जाणारा बु-हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रावेर-सावदा या रस्त्यावर विवरे गावाजवळ एका मालवाहू वाहनाचा तोल गेल्याने १६ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली.
यावल तालुक्यातील किनगाव येथून बऱ्हाणपूरकडे कांद्याने भरलेले हे वाहन जात असताना विवरे गावाजवळ उलटले. त्यात १६ जण जखमी झाले. त्या जखमीं पैकी शेख अमजद शेख सलीम, शेख कलीम शेख जैनौद्दीन हे गंभीर जखमी झाले आहे. इतर जखमींमध्ये शेख इमरान, आसीफ खान, शेख परवेज, शेख इस्माईल, शेख अजहर, शेख अनिस, शेख ऐजाज सर्व रा. कर्जीद ता. रावेर . आदींचा समावेश आहे.बया प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.