भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

online fraud : बँकतून बोलत असल्याचे सांगून ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा :  शहरातील एका डॉक्टरची बँकतून बोलत असल्याचे सांगून ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जोशी पेठ येथे रहिवासी डॉक्टर यांना १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना ८११४१७५१७३ क्रमांकावरून अनोळखी महिलेचा फोन आला. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन होत असल्याचे सांगत ते बंद करावे लागेल. तुम्ही बंद करणार नाही तर दर महिन्याला तुमच्या खात्यातून ४९३१२ रूपये भरावे लागतील असे सांगितले.

डॉक्टरला ओटीपी नंबर मागितला ओटीपी सांगताच लागलीच डॉक्टरच्या खात्यातून ४९ हजार ६१२ रूपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ८ मे रोजी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!