वाळू धोरणावर खुली चर्चा, सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता अल्प बचत भवन, जळगाव येथे खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
वाळू उपसा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या वाळू धोरणात सुधारणा, नियमावलीतील अंमलबजावणी, स्थानिक समस्यांवर तोडगा आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला जाणार आहे.
नागरिक, पर्यावरणप्रेमी, वाळू उपसा व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित घटक या चर्चेत सहभागी होऊ शकतील, या चर्चेत सर्वसामान्य नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी मिळणार असून, प्रशासना कडूनही धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक, वाळू उपसा व्यावसायिक आणि संबंधित हितधारकांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.