मुक्ताईनगर तालुक्यात रसायनमिश्रित ताडी व गावठी दारूची खुलेआम तेजीत विक्री !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि अक्षय काठोके | तालुका भरात अवैध धंद्यांना सुळसुळाट पाहायला मिळत असून गावठी दारू व रसायनमिश्रित ताडी तयार करून विक्री केली जात असल्याने अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील लहान मुलांना व्यसन जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बनावट ताडी व अवैध दारू विक्रीतून शहरात व परिसरात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी नेमणूक असलेल्या हद्दीत महिन्यातूनच एकदाच ‘उत्पादन’साठी फेरी मारताना दिसत आहेत.
मुक्ताईनगर शहरांमध्ये तालुक्यामध्ये अथवा जवळपास असलेल्या राज्यांमध्ये ताडीचे एकही झाड उपलब्ध नसताना अंतुर्ली व तालुक्यामध्ये ताडी हा मद्य नशेचा प्रकार कुठून येत आहे याकडे पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत ? शासनाने ताडीचे लायसन जरी दिले असले तरी ज्या ठिकाणी ताडेचे वृक्ष आहे ज्या ठिकाणी ताडी संदर्भात लागवड केली जाते त्या ठिकाणाहून ताडी पोहोचायला किती वेळ लागेल व किती टायमा संदर्भात ताडी पिण्या योग्य आहे नमुने वारंवार तपासणी साठी घेत असतात का असाही प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे जवळपास एकही झाड ताडीचे नसताना रोजच्या रोज एवढे ताडी येते तरी कुठून या मागचे गोडबंगाल पोलीस प्रशासन व अन्न औषध विभाग यांनी का शोधले नाही यामागे अन्न औषध वाल्यांचे चांगलेच आर्थिक देवाण घेवणीचे हात भिजलेले असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे
शहरासह तालुक्यात गावठी दारू व अवैध बोगस ताडी विक्री होत असून जीवाशी खेळणारा प्रकार हा होत आहे ताडी नेमकी कुठे बनवल्या जाते व कुठल्या स्वरूपात बनवली जाते हा प्रकार अद्यापही गुलदस्त्यातच बंद आहे ताडी पिणारा व्यक्ती याने जर एकही दिवस ताडी नाही पिली तर त्याच्या शरीराचे अवयव शरीराच्या मधून असे ताणले जात असून त्याला ना इलाजे त्या अवैध बोगस ताडीचे सेवन करायला ती ताडी भाग पाडत असते काही सूज्ञ नागरिकांचे यामध्ये असेही सांगण्यात येते की यामध्ये म्हशीच्या प्रजननाच्या वेळेस जे इंजेक्शन अथवा गोळ्या दिला जातात त्या इंजेक्शनचा व गोळ्यांचा वापर या ताडी मध्ये केला जातो जर अशी ताडी कित्येक नागरिक पीत असेल तर यामध्ये नपुसंकतेचा सुद्धा प्रकार काही दिवसांनी नागरिकांमध्ये आढळून येण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही तर अशी बोगस ताडी जर विक्री होत असेल तर प्रशासन याकडे लक्ष देतील का व अन्न व औषध विभागातील अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे ताडीचे बोगस दुकाने बंद करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
यामध्ये एक आईचा मुलगा एक पत्नीचा नवरा एक बहिणीचा भाऊ व देशाचा नागरिक असा एक जबाब दार व्यक्ती असून असा जबाबदार असलेला व्यक्ती व्यसनाचा नशा करून आपले आयुष्य तर बरबाद करतच आहे परंतु आपल्यावर अवलंबून असलेल्या आई,वडील, पत्नी, बहीण, मुलगा, मुलगी, असतील ते त्यांना पोर्क करून या जगाशी तो अखेरची झुंज देखील देत असल्याचे चित्र समोर आलेले आहे यामध्ये तरुण महिलावर्ग विधवा झालेल्या देखील दिसतात व म्हातारपणीचा सहारा म्हणून आई-वडील मुलाला लहानसे मोठं करतात व अशा व्यसनाधीनतेमुळे त्याचे कमी वयातच प्राण सोडावे लागत असून म्हातारपणाची काठी हिरावून घेतली जात आहे अशा केमिकल युक्त बोगस ताडी व गावठी दारू मुळे हा प्रकार घडत आहे तर शासनाने अशा बोगस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून देशाचा नागरिक कुपोषित न करता वाचवायला हवे अशी अपेक्षा व्यसनाधीन तरुणांचे आई-वडील करत आहे
ताडी पिणारे नागरिक अचानक ताडी पिणे बंद केल्यास झोप न लागणे जेवण न जाणे चिडचिड होणे हातपाय थरथर कापणे अंगात असाह्य वेदना होणे डोकं दुखणे डोळे जळजळ करणे या अशा अनेक त्रासांनी त्रस्त होऊन पुन्हा ताडी पिण्यासाठी जावेच लागते अन्यथा हे होणारे त्रास कोणत्याही औषधाने कोणत्याही सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर कडून कितीही सलाईन अथवा औषधी गोळ्या घेतल्या तरी सदर वरील त्रास पासून मुक्तता होत नाही त्यामुळे या ताडीमध्ये काहीतरी नशिले अन नेसेसरी घातक केमिकल गोड्या पावडर टाकले जात असल्याची ताडी पिणाऱ्यांच्या नाते नातेवाईक व मित्र परिवारांची ओरड आहे सदर ताडीही स्वस्त असल्यामुळे गोरगरीब मजूर कास्तकार जास्त प्रमाणात ताडी पीत आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे
स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का व ताडी मुक्त मुक्ताईनगर तालुका करणार का ? व ताडी विक्रीवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्तीत केला जात आहे आहे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा