भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनराजकीयरावेर

ब्रेकिंग | रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकर भरती चौकशीच्या फेऱ्यात !

रावेर, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | रावेर कृषी उपन्न बाजार समितीत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेली आहे. आता येथे मागील महिन्यात झालेली नोकर भरती विरोधात झालेल्या तक्रारीवरून चौकशीच्या फेऱ्यात अडकली असुन पणनच्या नियमांची पायमल्ली करून संचालक मंडळाला माहिती न करता मोघम प्रोसिडीग लिहून भरती करण्यात आली असल्याचा आरोप असल्याने पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांकडून देण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नोकर भरतीचे चौकशीचे आदेश दिल्यामुळे तालुक्याच्या राजकीय सहकारात मोठी खळबळ उडाली

यासंदर्भात नोकरभरती करतांना पणन महामंडळाच्या नियमांची पायमल्ली करून संचालक मंडळाला माहिती न करता मोघम प्रोसिडीग लिहून विषय मंजूर करून बेकायदेशीर रित्या दोन शिपाई व एक वाचमन अशी नोकर भर्ती करून प्रोसिडिंग केले गेले यात जवळच्या आप्तेष्टांनाची भरती केली असल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदार मंदार पाटील यांनी मंडे टू मंडे न्युज शी बोलताना सांगितले.

रावेर कृषी उपन्न बाजार समितीत लंपी रोग्याच्या प्रादुर्भावा दरम्यान गुराचा बाजार भरवण्या पासून अनेक कारणांनी चर्चेत राहिलेली आहे आता पुन्हा रावेर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये मागील महीन्यात करण्यात आलेल्या नोकर भरती प्रकरणाने चर्चेचा विषय बनली असुन ही भरती चौकशीच्या फेर्‍यात अडकली आहे.

जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे संचालक मंदार पाटील यांनी या नोकर भरती चौकशीच्या संदर्भात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी सहाय्यक निबंधक यानां पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने आता या चौकशीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!