भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सावदा येथे २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील व्हा ! – हिंदु जनजागृती समिती

सावदा, ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महान हिंदु संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करण्याचे सर्वोच्च कार्य गुरु-शिष्य परंपरेमुळे साध्य झाले. अशा तेजस्वी गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करण्यासाठी आणि समाजामध्ये “हिंदु राष्ट्र” स्थापनेच्या कार्यासाठी प्रेरणा निर्माण करण्याकरिता” हिंदु जनजागृती समिती” च्या वतीने यावर्षी २१ जुलै २०२४ या दिवशी देशभरात ६७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे

श्रीकृष्ण-अर्जुन, समर्थ-शिवराय, आर्य चाणक्य   -चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्यामुळे धर्मसंस्थापनेचे कार्य होऊन राष्ट्र उद्धाराचेही कार्य झाले. गुरूंची कृपा संपादन करण्याकरिता गुरूंचे धर्मसंस्थापनेचे म्हणजेच हिंदू राष्ट्र-स्थापनेचे कार्य आपण अंगीकारले पाहिजे. याविषयी सविस्तर विवेचन व्हावे, याकरिता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नगरपालिका सभागृह, कोचुर रोड, सावदा येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन) केले जाईल. ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना ’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. विविध विषयांवरील आध्यात्मिक, राष्ट्र आणि धार्मिक ग्रंथविषयीचे ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे, तरी परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने श्री. प्रशांत जुवेकर, उत्तर महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती, यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!