भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

जिल्ह्यात पुन्हा हत्या, डोक्यावर लाकडी दांडा व दगडाने ठेचून तरुणाची निर्दयी हत्या

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l ३५ वर्षीय तरुणाचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घूण खून झाल्याची घटना आज दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी चोपडा तालुक्यातील अडावद येथील लोखंडे नगरमध्ये उघडकीस आली. या मयत तरुणाचे नाव बापू हरी महाजन तो असे असून तो लोखंडे नगर मधीलच रहिवाशी आहे.या घटनेमुळे अडावद सह चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी चोपडा तालुक्यातील अडावद
येथील भगवान नगर मध्ये मोकळ्या जागेवर एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असून त्याची हत्या झाल्याची बातमी आज सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली.

पोलीसांना या बाबत माहिती मिळताच अडावदचे सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजु थोरात, भरत नाईक, संजय धनगर, सतीश भोई, विनोद धनगर, भुषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत, चंद्रकांत कोळी, प्रवीण महाजन, संजय शेलकर यांनी घटनास्थळी धाव घेत मयताची ओळख पटउन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण हा लोखंडे नगरमधील बापू हरी महाजन. वय- ३५ वर्ष असल्याचे उघडकीस आले.

बापू महाजन या तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री त्याची लाकडी दांड्याने व दगडांनी ठेचून निर्घून हत्या केल्याच समोर आले.

घटनास्थळी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या संदर्भात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून अडावद पो. स्टे. हद्दीत महिनाभरातच झालेल्या या तिसऱ्या खूनामुळे परिसरात खळबळ उडाली असून मयताच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

घटनेचा मागोवा घेण्यासाठी जळगाव येथील ‘चॅम्प’ नामक श्वानासह पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. कविता नेरकर, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे व त्यांची टीम तसेच ठसे तज्ञ किरण चौधरी, रफिक शेख हे दाखल झाले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे घेतले. हत्या का करण्यात आली हे अजून उघड झाले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!