संतापजनक : १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १२ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीशी गोड बोलून तिच्याशी जवळीक साधत तिचे लैंगिक शोषण करून नरसमधाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना जळगाव तालुक्यात एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली.
१२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही जळगाव तालुक्यातील एका भागात कुटुंबासह वास्तव्यास असून आरोपी संदीप बळीराम तायडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) या नराधमाने जानेवारी पासून पीडितेच्या बालमनाचा फायदा घेत, तिला गोड गोड बोलून तिला फूस लाऊन वेळोवेळी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने पीडित मुलीचा विनयभंगही केला.
सोमवार दि. २ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास, आरोपी पीडितेस शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घरून घेऊन गेला.मात्र, त्याने तिला शाळेत न नेता अजंठा चौफुलीवरून भुसावळ रोडने नशिराबाद शिवारातील एका शेतात नेले. त्या ठिकाणी असलेल्या एका झोपडीत नेऊन आरोपीने पीडितेच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी ४ मार्च बुधवार रोजी संध्याकाळी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन ला पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोस्को व कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप बळीराम तायडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी संदीप तायडे याला अटक केली आहे.


