संतापजनक : ५० वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला “माझं तुझ्यावर प्रेम आहे” म्हणत अश्लील व्हिडिओ दाखवला…काय घडलं पुढे…
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील एका ५० वर्षीय शिक्षकानेच ,”माझे तुझ्यावर प्रेम आहे” म्हणत विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनीला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या शाळेतील आहे.
विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी गेली असता तिच्या मागेच तिच्या शाळेतील शिक्षक उमेश टीकाराम मेश्राम वय ५० वर्ष हा तिच्या घरी आला. त्याने या मुलीला ,”माझे तुझ्यावर प्रेम आहे” म्हणत अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवली, परंतु मुलीने शिक्षक दाखवत असलेली व्हिडिओ क्लिप पाहाण्यास नकार देताच शिक्षकाने पीडित मुलीचे केस धरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग करत गैरवर्तन केले.
या धक्कादायक प्रकारा बाबत आरोपी शिक्षक उमेश टीकाराम मेश्राम वय ५० वर्ष यांचेवर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून उमेश टीकराम मेश्राम या शिक्षकाचं निलंबन देखील करण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.