संतापजनक : शालेय पोषण आहारात चक्क तळलेला बेडूक
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पॅकेट मध्ये केव्हा काय निघेल हे सांगताच येत नाही. केव्हा उंदीर, झुरळ,पाल, चिमणी, अळ्या असे अनेक प्रकारचे कीटक , सरपटणारे प्राणी,पक्षी निघतात पण आता सकस आहार म्हणून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेट मध्ये मेलेला बेडूक सापडल्याची संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी या गावात घडला.
राज्यात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत साहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी पोषण व्हावे म्हणून खिचडी साठी पॅकेट दिले जातात. पाडोळी गावातील पूनम ह्या खिचडी बनविण्यासाठी आहाराचे दिलेले पॅकेट फोडले असता त्यात चक्क तळलेला बेडूक आढलुन आला असता त्यांनी हा प्रकार गावातील इतरांना सांगितला असता संबधीत अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असला तरी लहान बालकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात असून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पालक महिला व नागरिकांकडून केली जात आहे.