भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

संतापजनक : वडील नात्याला काळीमा, १३ वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक हादरवरुन सोडणारी घटना समोर आली आहे. १३ वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारं शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घटणाऱ्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेल्याची टीकाही होत असते. त्यातच, आता अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रकार जुलै २०२२ ते जून २०२४ या कालावधी दरम्यान घडला आहे. विशेष म्हणजे मुलीचे वडिल, चुलते आणि चुलत भावानेच हा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिले आहे. पीडित मुलीने यासंदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, काका व चुलत भाऊ यांसह एकत्र कुटुंबात मांजरी भागात वास्तव्यास असून हे कुटुंबीय परप्रांतीय आहे. पीडित मुलीवर जुलै २०२२ मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. तर, जानेवारी २०२४ मध्ये पीडित तरुणीच्या काकाने रात्रीच्या वेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचेही आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!