संतापजनक : नराधमाचा ११ वर्षीय चिमुकलीवर तीन महिन्यांपासून अत्याचार, मौलानाला अटक
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकवणी साठी घरी येणाऱ्या एका ११ वर्षीय चिमुकलीवर मौलाना ने नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. हा मौलाना तीन महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचे धक्कादायक घटना बीड मधून समोर आली आहे.
बीड शहरातील मोमीन पुरा भागात राहणारा रियाज त्याच्या राहत्या घरी उर्दू व अरबी भाषेची शिकवणी घेत होता. यामध्ये प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी होती. पत्नी आणि मुले घरी नसताना त्याने हे दुष्कर्म केले असल्याचे चिमुकलीच्या आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केल्याचेही म्हटले आहे. प्रकरणांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. बीड पोलीसांनी तत्काळ नराधमाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.