भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

संतापजनक : एकीकडे भावना दुखावल्या म्हणून आक्रोश, तर दुसरीकडे महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत विनयभंग

नागपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण पेटलेलं असून त्या मुद्यावरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटात हिंसक हाणामारी झाली. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारातील अनेक दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली. समाजकंटकांना यावेळी दगडफेक केली, अनेक वाहनांची जाळपोळ केली. यामध्ये ३३ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर काही नागरिक देखील जखमी झाले आहे. याशिवाय आणखी संतापजनक धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे.

हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना बंदोबस्तात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत जमावाने गैरवर्तन करत विनयभंग केला.

भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून विनयभंग करण्याचा संतापजनक प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रयत्न या दंगेखोरांनी केला.

दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुटका केल्याने मोठा अनर्थ ठळला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनेक महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी केल्याचीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना . मंगळवारी या आरोपींना कोर्टाने २१ मार्च  पर्यंत पीसीआर दिला आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आतापर्यंत एकूण ४६  आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी ३६ आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून महाराष्ट्र एटीएसकडूनही नागपूर हिंसाचाराचा समांतर तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!