पं.स. विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामसेवक लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
धरणगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यासह एका ग्रामसेवकाला आज दोन हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणुन नोकरीसअसलेले तक्रारदार त्यांचे सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेल्याने सदर जादा देण्यात आलेली रक्कमेची परतफेड करणेबाबत तक्रारदार यांना नोटीस आल्याने सदर नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषद,जळगाव येथे पाठविण्याच्या मोबदल्यात सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, धरणगाव, रा.गंगूबाई नगर, पारोळा) तसेच कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५,ग्रामसेवक, ग्रामपंचायत, कंडारी बुद्रूक ता.धरणगाव,रा. बोरोले नगर,चोपडा) या दोघांनी प्रत्येकी १ हजार रूपये असे एकुण २,००० रुपये लाचेची मागणी केली मात्र याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आल्याने तसेच सदर लाचेची रक्कम ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळेने हॉटेल मानसी,चोपडा येथे पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
सदरील कारवाई शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस उप अधीक्षक, PI. संजोग बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर,पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकाॅ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.