Breaking : एकनाथ खडसेंच्या PAसह निकटवर्तीय कार्यकर्त्याचा फोन टॅप ! धक्कादायक माहिती समोर
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसाच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. रश्मी शुक्ला यांनी फक्त राष्ट्रवादीचे नते एकनाथ खडसेंसह त्यांंच्या स्वीय सहाय्यक आणि जवळच्या एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप केल्याची माहिती समोर येत असून यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी हजर राहण्यास सांगितल्यानंतर गुरुवारी खडसे यांनी कुलाबा पोलिसात जवाब नोंदवला आहे. अनेकदा बड्या नेत्यांच्या व्यस्त शेड्युलमध्ये खासगी फोन हा स्वीय सहाय्यकाकडे असतो. तसंच राजकीय पुढाऱ्यांशी बोलण्याआधी अनेकजण आधी स्वीय सहाय्यकांकडून संबधित पुढाऱ्याबाबतची विचारपूस करतात त्यामुळेच खडसेंच्याही स्वीय सहाय्यक आणि जवळच्या व्यक्तीचे फोन टॅप (Phone Tap) केल्याचा संशय पोलिसांना आहे.
त्यानुसार खडसें पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आल्याच सूत्रांनी सांगितले. पोलिस चौकशीत खडसेंनी त्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली असून हा आपल्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मात्र, हे करून रश्मी शुक्ला यांना काय मिळणार आहे? या मागे नेमका कुणाचा हात आहे. हे पोलिसांनी शोधण गरजेचं असल्याची माहिती खडसेंनी पोलिसांना दिल्याचे माहिती समोर येत आहे आता प सह निकटवर्तीयांच्या फोन टॅप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.