चुलत भावा कडूनच अल्पवयीन बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। शालेय सुट्टीमध्ये आजीकडे आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत चुलतभाऊनेच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पचोरा तालुक्यात घडली .
दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शालेय सुट्ट्या असल्याने आपल्या आजीच्या घरी आली होती. रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास तिच्या चुलत भावाने अल्पवयीन चुलत बहिण झोपलेली असतांना तिच्यासोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला.पण ती भेदरून जागी झाल्याने तिने विरोध केला असता आरोपी भावाने गळा दाबून जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केळा. या प्रकरणी चुलत भाऊ विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोस्को अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.