१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी पाचोरा तालुक्यातून बेपत्ता
पाचोरा,जि. जाळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका लग्न समारंभातून पाचोरा तालुक्यातून तालुक्यातीलच एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली.
या बाबत अधिक माहिती अशी की, दि. २५ जुन रोजी पिंप्री ता. पाचोरा येथे पाचोरा तालुक्यातीलच १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्याच नातेवाईकाच्या एका लग्न समारंभात कुटुंबासह आली होती, दुपारच्या वेळेला ती मुलगी लग्नसमारंभात दिसून आली नाही ,नातेवाईकांनी तिची सर्वत्र शोधा-शोध केली असता ती मिळून न आल्याने तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची शंका आल्याने आज दि २६ जून रविवार रोजी तिच्या पालकांनी पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्याने पाचोरा पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.