दोन वर्षीय मुलीसोबत ५५ वर्षीय नराधमाचे अश्लील चाळे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पाचोरा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पाचोरा तालुक्यातील २ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५५ वर्षीय सुभाष महादू महाजन या नराधमाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली .
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यात मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गावातच घराशेजारी राहणारा सुभाष महादू महाजन वय ५५ वर्षे हा दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे करत होता. मुलीची आई मुलगी दिसत नाही म्हणून मुलीची शोधाशोध करत शेजारीच सुभाष महाजन याच्या घरात गेली असता हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. मुलीच्या आईने आरडाओरडा केल्याने नागरिक जमा होत संतप्त झाले, संतप्त नागरीकांनी संशयिताला पकडून सामूहिक चोप देऊन पोलिसांच्या हवाली केला असून मुलीच्या आईच्या तक्रारी वरून सुभाष महाजन याच्यावर पाचोरा पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुभाष महाजनला चांगलाच चोप दिल्याने या हाणामारीत जखमी झाल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.