पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर, दुपारी बारा वाजे नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात शुकशुकाट
पाडळसे ता.यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l यावल तालुक्यातील पाडळसे येथील आरोग्य केंद्रामध्ये दि.३ रोजी दुपारी १२.३० वाजता पाडळसे गावातील युवक उपचारासाठी गेले असता प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता डॉक्टर व इतर कोणीही उपस्थित नव्हते.
यावल तालुक्यातील पाडळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळ जवळ १२ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा कारभार चालतो. प्रार्थमिक केंद्राच्या हद्दीतून भुसावळ – बऱ्हाणपूर हा राज्यमार्ग येतो. या मार्गावर नेहमी लहान मोठे अपघात होत असतात तसेच याच प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडली जाते. तरी एकूण सर्वांच्या आरोग्याचा आणि सुरक्षितेचा विचार करता प्रार्थमिक आरोग्य केंद्र पाडळसे येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहणे आवश्यक आहे .