भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

पाडळसे शिवमहापुराण कथा : अखेर पत्रकारांची दखल ; स्वतंत्र ‘प्रेस गॅलरी’ची व्यवस्था

आयोजन समितीकडून त्रुटींची तातडीने सुधारणा; पत्रकारांच्या नाराजीनंतर प्रशासकीय तत्परता

पाडळसे,ता. यावल.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |
पाडळसे-अकलूद शिवारात सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या ‘श्री शिवमहापुराण’ कथेच्या दुसऱ्या दिवशी आयोजकांनी माध्यम प्रतिनिधींची दखल घेतली आहे. पहिल्या दिवशी बैठक व्यवस्था नसल्याने पत्रकारांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर, आज आयोजकांनी व्यासपीठासमोर सुसज्ज ” प्रेस गॅलरी” आणि वार्तांकनासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भात” मंडे टु मंडे न्युज”  ने वृत्त प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेत पत्रकारांच्या मागणी नुसार व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.

नियोजनातील त्रुटी दूर
कथेच्या पहिल्या दिवशी माध्यम प्रतिनिधींना गर्दीत उभ्याने वार्तांकन करावे लागले होते, ज्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीने याची गंभीर दखल घेतली. आज सकाळपासूनच पत्रकारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि बसण्याची जागा निश्चित करण्यात आली. यामुळे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला असून, आयोजकांनी केलेल्या या तत्पर सुधारणेचे स्वागत होत आहे.

माध्यमांच्या शक्तीचा विजय
“आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सोहळ्याची माहिती भाविकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार रात्रंदिवस करत आहेत. त्यांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होणे चुकीचे होते, जे आता सुधारण्यात आले आहे,” अशी भावना स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली. आयोजकांनी केवळ बैठक व्यवस्थाच नाही, तर पत्रकारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रशासनाकडून पाहणी
महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आज प्रेस गॅलरीची पाहणी करून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. नियोजनातील हा बदल पाहता, आगामी दिवसांत

“पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक मनुष्य समान आहे, तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो. शिवमहापुराण कथेच्या मंडपात कोणताही भेदभाव नसतो, येथे येणारा प्रत्येक भक्त केवळ ‘शिवभक्त’ असतो,” असे मार्मिक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी कथेच्या दुसऱ्या दिवशी केले.
कथेतील महत्त्वपूर्ण विचार आणि संस्कार
हरी चंदन आणि शिवचंदन पंडितजींनी चंदनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, सुकलेल्या तुळशीपासून ‘हरी चंदन’ तयार होते, तर बेलपत्रापासून ‘शिवचंदन’ तयार होते. या दोन्हीचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.
नकारात्मकता टाळा प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्वतःबद्दल नकारात्मक बोलणे टाळावे, कारण त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. जेव्हा आपण स्वतःबद्दल सकारात्मक विचार करतो आणि बोलतो, तेव्हा जीवनात सकारात्मक बदल घडतात.
समभाव आणि प्रेम एकत्र कुटुंबात सर्वांवर समभाव ठेवून प्रेम केल्यास मोठी पुण्यप्राप्ती होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

शेगावच्या गजानन महाराजांच्या भंडाऱ्याचा गौरव
कथेदरम्यान पंडितजींनी महाराष्ट्रातील संतांचा गौरव करताना सांगितले की, “जगातील सर्वात मोठा भंडारा कुठे लागत असेल, तर तो शेगाव निवासी संत गजानन महाराज यांच्या मठात लागतो. तिथे अनेक वर्षांपासून अविरतपणे भक्तांचे पोट भरले जात आहे.”
चमत्कारिक प्रचिती: १३ वर्षांनंतर संतती प्राप्ती
कथेत भाविकांच्या पत्रांचे वाचन करण्यात आले. भुसावळ येथील एका महिलेने पत्राद्वारे आपली भावना व्यक्त केली की, पाच वेळा श्रद्धापूर्वक कथा श्रवण केल्यामुळे लग्नाच्या १३ वर्षांनंतर तिला अपत्यप्राप्ती झाली. या प्रचितीने मंडपातील हजारो शिवभक्तांचे डोळे पाणावले.
दुसऱ्या दिवसाचे प्रमुख आकर्षण आणि व्यवस्था:

  • पत्रकारांची मागणी मान्य: पहिल्या दिवशी झालेल्या गैरसोयीनंतर आयोजकांनी तातडीने दखल घेत पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार गॅलरी’ आणि खुर्च्यांची व्यवस्था केली, ज्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
    प्रशासनाची सेवा: कथास्थळी भाविकांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी असूनही पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, एस.टी. महामंडळ आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जि.प. पं.स. अधिकारी कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. १५ मार्चपासून मध्य प्रदेशातील कुबेरेश्वर धाम (सिहोर) येथे रुद्राक्ष सोहळा सुरू होणार असल्याची माहितीही पंडितजींनी यावेळी दिली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!