दुचाकीवर झाड कोसळून वडिलांचा मृत्यु तर मुलगा जखमी,रावेर तालुक्यातील घटना
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे दि.२३ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायकाळी ४. ३० वाजेच्या सुमारास मुंजलवाडी – कुसुंबा – पाल रोडवरील रमेश भगवान पाटील यांच्या शेताजवळील खडक्यानदी पो . हेलापडाव ता. झिरण्या (मध्य प्रदेश ) येथील शेतकरी रावेर येथून शेती उपयोगी साहित्य ठिंबक घेऊन मोटर सायकल गाडी क्र MP – 10 MX 0660 वर आपल्या मुला सोबत घरी जात असतांना पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अचानक निबांचे झाड हे मोटर सायकल वर कोसळले असता यात दुदैवी बदा मांगु सोलंकी याचा झाडा खाली दाबुन मृत्यु झाला .
सदर घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक तसेच मुंजलवाडी गांवचे पोलीस पाटील राधेश्याम धनगर ,संरपंच अशोक हिवराळे , मुंजलवाडी भाजपा शाखा प्रमुख प्रविण अजलसोंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रावेर पोलिस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल सतिष सानप , संतोष गोदगे यांनी मयत यांचा पंचनामा करुण शव विच्छेदना साठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले तसेच त्याचा मुलगा जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णाल्यात आणण्यात आले तसेच रावेर पो निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो .हे .कॉ. सिकंदर तडवी पुढील तपास करीत आहे