भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

पाकिस्तान हादरला ! नमाज दरम्यान मशिदीत बॉम्बस्फोट, ३१ ठार,१६९ जखमी

इस्लामाबाद,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मधील एका मशिदीत आत्मघातकी हल्ला झाला. तारलाई परिसरातील इमाम बारगाह खादीजत- उल-कुब्रा येथे शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात ३१ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटानंतर शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आली. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, फितना अल-खवारीजशी संबंधित हल्लेखोराने गेटवर थांबल्यानंतर स्वतःला उडवून दिले.

ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ती शिया मशीद आहे. या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसर सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट आत्मघातकी बॉम्बस्फोट होता. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्झीयोयेव दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी पोलिसांचे प्रवक्ते तकी जवाद म्हणाले की, स्फोटाचे स्वरूप निश्चित करणे अद्याप घाईचे आहे आणि फॉरेन्सिक पथकांना हा आत्मघातकी हल्ला होता की पेरलेला बॉम्ब होता हे ठरवावे लागेल

माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके तातडीने पोहोचली आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये इमाम बारगाहच्या जमिनीवर लोक बेशुद्ध पडलेले दिसत आहेत, तर काही जण एकमेकांना मदत करताना दिसत आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी कडक दक्षता राखत इमाम बारगाह आणि आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. राजधानीतील पॉलीक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA हॉस्पिटलमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

पाकिस्तानात अलीकडे झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला आहे. स्फोटानंतर मृतदेहांचे अवयव इथे-तिथे विखरुन पडलेले होते. प्राथमिक दृष्टया हा आत्मघातकी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि सैन्याची टीम पोहोचली आहे. सैन्याने पूर्ण भागाला घेराव घातला आहे. स्थानिक मीडियानुसार हा स्फोट कसर-ए-खदीजतुल कुबरा मशिदीत झालाय. इस्लामाबादमधील या मशि‍दीला बडी मशीद सुद्धा म्हटलं जातं. घटनेनंतर काही व्हिडिओ फुटेज व्हायरल झालय. यात लोक सैरावैरा पळताना दिसतायत. ब्लास्टनंतर खबरदारी म्हणून सगळ्या इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!