भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य जोपासले पाहिजे-आ शिरीष चौधरी यांचे कृषी संजीवनी सप्ताहात प्रतिपादन

Monday To Monday NewsNetwork।

पाल. ता. रावेर ,प्रतिनिधी(सुरेश पवार)। दि.२२/६/२१ रोजी रावेर तालुक्यातील रोझोदा येथे
कृषी संजीवनी सप्ताह २०२१ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र,पाल(जळगांव-१) व कृषी विभाग,जळगांव महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्तपणे शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून अधिक उत्पादन प्राप्त करण्यासोबतच मातीचे आरोग्य जोपासले पाहिजे असे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून आ.शिरिष चौधरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना मत व्यक्त केले.

१ जुलै पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विविध प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.केळी पिकातील रोग व कीड नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पध्द्तीचा अवलंब करून पीक व्यवस्थापन करण्याचा सल्ला तांत्रिक सत्रात प्रा.महेश महाजन(प्र. प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ,के व्ही के,पाल)यांनी दिला तसेच गट शेतीची कास धरून कृषी प्रक्रिया करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन श्री.कुर्बान तडवी(उपविभागीय कृषी अधिकारी, जळगांव)यांनी केले.या प्रसंगी व्यासपीठावर श्री.मयूर भामरे(ता कृ आ,रावेर),श्री.रमेश दादा महाजन,श्री.मिलिंद वायकोळे, श्री.रवींद्र चौधरी आदी मान्यवर व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम सोशल डिसस्टसिंग,मास्क व सॅनिट्झर चा वापर करून संपन्न झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!