भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

पाल परिसरात जनजागृती, लस घ्या आणि आपले गाव कोरोनामुक्त ठेवा-डॉ अभिजित राऊत

Monday To Monday NewsNetwork।

पाल (सुरेश पवार)। पाल ता रावेर दि 30।6।2021 कोरोना महामारीत चांगले लोक मरण पावले आहे जर कोरोनापासून आपला आणि आपल्या परिवाराचे संरक्षण करायचे असेल तर सर्वांनी लस घ्या लस बाबत मनातील गैर समज काढून टाका घाबरू नका असे जळगाव जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांनी रावेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील निमडया या आदिवासी पाड्यात आयोजित कार्यक्रमात उपस्थितआदिवासी बांधवाना सांगितले

रेशन कार्ड व विविध दाखले वाटप
रावेर महसूल विभागातर्फे निमडया येथे रेशन कार्ड आणि विविध दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात आले यात पाच लाभार्थ्यांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले तसेच दहा दावे मंजूर करून मान्यता देण्यात आले
त्याचबरोबर आदिवासी गोर गरिबांना रेशन वेळेवर देण्यात येते की नाही याची विचार पूस करण्यात आले तसेच उपसरपंच इरफान तडवी निमडया यांनी पाल ,गारखेडा, निमडया या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी त्याचबरोबर येथीलच माजी ग्राप सदस्य कुवरसिंग बारेला यांनी दहा महिन्यापासून रेशन दुकानदाराकडे रेशन कार्ड जमा करण्यात आले आहे मात्र कार्डही देत नाही आणि रेशन धान्य ही देत नाही अशी व्यथा जिल्हाधिकारी याचे समोर मांडली
ग्रामीण रुग्णालयाची केली पाहणी
येथील ग्रामीण रूग्णालयात भेट देऊन रुग्णालयातील लसीकरणकेंद्र ,इतर सोयीसुविधेची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी याना संगितले की एकही डिलेवरी रुग्ण जळगावला रेफर करू नका काही अडचणी असेल तर कळवा तसेच डॉ बी बी बारेला यांनी जिल्हाधिकारी यांना रुग्णालयातील सर्व व्यवस्थेबाबत माहिती दिली

कृषी विज्ञान केंद्रात केले वृक्षारोपण
पाल येथील सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल येथे जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन गांडूळ खत प्रकल्प,केळीच्या खोडाच्या धाग्यापासून तयार करण्यात आलेली वस्तूची पाहणी केली भेटीदरम्यान जिल्हाघिकारी यांनी उपस्तीत महिला शेतकऱ्याना परसबाग बियाणे किटचे वाटप करण्यात आले तसेच कृषी प्रदर्शनी व केविकेच्या विविध उपक्रमबाबत सखोल चर्चा केली कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगाव बी ऐन पाटील,तहसीलदार उषाराणी देवगुणे ,गटविकासधिकारी दीपाली कोतवाल, मंडलधिकारी सचिन पाटील सा पु वि म सचिव अजित पाटील, प्रभारी संचालक महेश महाजन,धीरज नेहते मुस्तुफा गुरुजी,प्रमोद भांगाळे, व ग्रामविकास अधिकारी दिलीप तडवी ,डी एम वळवी, राजू तडवी ,तलाठी गुणवन्त बारेला, गावातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!