बलवाड़ी येथे पनामा रोगावर कार्य शाळा
बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशिष चौधरी | केळीवरील “पनामा” आधारित शेती शाळेची सुरुवात मौजे बलवाडी तालुका रावेर, येथे करण्यात आली. सदर शेती शाळेमध्ये केळी लागवडीच्या आधुनिक पद्धती बरोबरच केळीवरील CMV, केळीवरील करपा (सिगटोका) तसेच नवीन येऊ घातलेला बुरशीजन्य रोग म्हणजे “पनामा” यावर चर्चा करण्यात आली.
“पनामा”आधारित शेती शाळेसाठी मौजे बलवाडी येथील शेतकरी तसेच केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक श्री.सचिन गायकवाड व कृषी सहाय्यक श्री.अविनाश थोरात हे उपस्थित होते. प्रत्यक्ष श्री. संजय महाजन यांच्या शेतावर काही खोडांची पाहणी केली असता त्यामध्ये खोडकिडा व खोडकिडेच्या विविध अवस्था सर्व शेतकरी बांधवांना दाखवण्यात आल्या व त्यावरील उपाय योजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पुढील शेती शाळेचा वर्ग दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी घेण्याचे सर्वानुमते ठरले.