पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच घेताना पकडले, जळगाव एसीबीची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वर्क ऑर्डर काढण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या धरणगाव पंचायत समितीच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रवीण चौधरी याला दीड हजार रुपये घेताना कार्यालयातच जळगाव एसीबी ने अटक केली. ही घटना आज २१ मार्च शुक्रवार रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली.
वर्क ऑर्डर देण्या साठी तक्रारदाराला धरणगाव पंचायत समितीच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रवीण चौधरी याने दीड हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने जळगाव एसीबी कडे तक्रार केली होती. त्या नुसार सापळा रचण्यात येऊन शुक्रवार रोजी दुपारी पावणेतीन वाजता पंचायत समितीच्या कार्यालयात धरणगाव पंचायत समितीच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रवीण चौधरी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली. या संदर्भात पुढची कारवाई सुरू असून जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.